माहेश्वरी प्रगती महिला मंडळातर्फे बाई-बेटी संमेलन उत्साहात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या वतीने अधिक मासाच्या पावन निमित्ताने आयोजित आओ बाईसा पधारो सा बाई-बेटी संमेलन दि.२१ मे रोजी एम.आय.टी. कॉलेजच्या मंथन हॉल येथे उत्साह, पारंपरिक वैभव आणि दिमाखात संपन्न झाले.
विशेष संमेलनात सुमारे ५५० बाई-बेटी तसेच ४५० मंडळ सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सरिता बलदावा उपस्थित होत्या. विशिष्ट पाहुण्या म्हणून अखिल भारतीय मारवाडी महिला सम्मेलन राष्ट्रीय अध्यक्षा रेखा राठी, राखी लड्डा, सरला लाहोटी तसेच पुष्पा लड्डा यांची उपस्थिती लाभली. यावेळी माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष सचिन करवा, जिल्हा सभा अध्यक्ष श्यामसुंदर सोमानी, युवा संघटनेचे अध्यक्ष वैभव मंडोरा, माहेश्वरी महिला जिल्हा संघटना अध्यक्षा अर्चना भट्टड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नंदकिशोर मालपानी आणि रेणुका मालाणी यांनी केले. याप्रसंगी
अकोला येथून आलेल्या निधी मंत्री यांनी खेळ व मनोरंजन विभागाचे संचालन करत विविध रोचक उपक्रमांद्वारे सर्व बाई-बेटींना आनंदित केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले लाडीबाई सुपरस्टार विशेष सन्मान, ज्यामध्ये समाजातील अशा गुणी महिलांचा गौरव करण्यात आला.
सायंकाळी राजस्थानी थीमवर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अधिक मासानिमित्त सर्व बाई-बेटींना वाण भेट देऊन निरोप देण्यात आला. माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या
अध्यक्षा स्वाती खटोड, सचिव राधिका मालू आणि कोषाध्यक्ष अर्चना चितलांगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर, समाजबंधू आणि सहभागी बाई-बेटींचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन म्हणून उषा धूत, प्रीति डागा, पल्लवी मालाणी आणि कोमल भट्टड यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण समाजाकडून तन, मन आणि धनाने मोठे सहकार्य लाभले, त्याबद्दल माहेश्वरी प्रगती महिला मंडळाने सर्व समाजबंधूंचे आभार मानले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions